पाली चर्चमध्ये पुन्हा जुळले मंगल सूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाली चर्चमध्ये पुन्हा जुळले मंगल सूर
पाली चर्चमध्ये पुन्हा जुळले मंगल सूर

पाली चर्चमध्ये पुन्हा जुळले मंगल सूर

sakal_logo
By

विरार, ता. १३ (बातमीदार) : पंचवीस वर्षांपूर्वी अनुभवलेले मंगल क्षण, आपल्या जोडीदारासोबत घेतलेल्या आणाभाका आणि विवाहाचा पवित्र प्रसंग पुन्हा एकदा जगण्यासाठी वसईतील पाली चर्चमध्ये फादरांच्या साक्षीने अनेक जोडपी एकत्र आली. विवाहाला २५ आणि ५० वर्षे पूर्ण झाली अशा पती-पत्नींनी त्यांच्या विवाहाच्या वेळी दिलेल्या वचनांचा नूतनीकरण करण्याचा चांगला पायंडा वसईमध्ये सुरू आहे.
ज्यांच्या लग्नाला पंचवीस किंवा पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा जोडप्यांनी पवित्र मिस्सामध्ये पुन्हा एकदा फादरांचा आशीर्वाद घेत आपल्या विवाहाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील अनुभव या वेळी कथन केले. आजारपणात, व्यवसायात तोटा झाल्यानंतर, कोरोनाकाळात, नोकरीतील मानसिक त्रासात, आनंदाच्या सोहळ्यात एकमेकांना कसा आधार मिळाला, याचे भावनिक कथन या वेळी अनेक जोडप्यांनी केले. उपस्थित जोडप्यांसाठी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच त्यांना स्पॉट बक्षिसेही देण्यात आली. चर्चमध्ये एक वेगळा अनुभव आणि पती-पत्नीमधील निरागस नातेसंबंधांना पुन्हा एकदा उजाळा देत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे पौरोहित्य पाली चर्चचे धर्मगुरू फादर रेमंड रुमाव यांनी केले.