Wed, March 22, 2023

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक किरण लांडगे यांना अटक
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक किरण लांडगे यांना अटक
Published on : 13 February 2023, 12:21 pm
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक किरण लांडगे यांना मुंबईतील विनोबा भावे नगर पोलिसांनी आज अटक केली आहे. लांडगे पालिकेच्या वॉर्ड क्र. १६० चे माजी नगरसेवक आहेत. एक वर्षापूर्वी त्यांनी प्रभागात पाणीप्रश्नावरून पालिका कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी काही शिवसैनिकांनी पालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली होती. त्यामुळे लांडगे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. याबाबत झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांचा जमीन रद्द केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. लांडगे यांना अटक केल्याने शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. शिंदे गटाच्या दबावाखाली पोलिस काम करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.