तुळजाभवानी मंदिरात महिलांनाही पूजेची संधी द्यावी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुळजाभवानी मंदिरात 
महिलांनाही पूजेची संधी द्यावी!
तुळजाभवानी मंदिरात महिलांनाही पूजेची संधी द्यावी!

तुळजाभवानी मंदिरात महिलांनाही पूजेची संधी द्यावी!

sakal_logo
By

मुंबई ता. १३ : तुळजाभवानी मंदिरात महिलांच्या हस्ते पूजा करण्याबाबत स्थानिक भोपे पुजारी कुटुंबातील महिलांची भावना लक्षात घेऊन याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली. तुळजाभवानी मंदिरातील काही विषयांबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या सूचना आणि तक्रारीवरून गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे निवदेनाद्वारे ही मागणी केली. मंदिर गाभारा प्रवेश आणि दर्शन नियम सर्वांना समान असावेत. महिलांना गाभारा प्रवेश पूर्वीप्रमाणेच चालू ठेवावा, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली. तसेच स्थानिक पुजारी भोपे कुटुंबियांच्या महिला प्रतिनिधींना या मंदिरात पूजा करण्याबाबत त्यांनी केलेल्या मागणीनुसार परवानगी देण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.