Tue, March 21, 2023

ठाण्यात ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गाचे आयोजन
ठाण्यात ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गाचे आयोजन
Published on : 14 February 2023, 11:18 am
ठाणे, ता. १४ (बातमीदार) : ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने दरवर्षी ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग चालवण्यात येतो. या वर्षी हा वर्ग १ मार्चपासून ठाण्यात सुरू होणार आहे. त्याचा कालावधी तीन महिन्यांचा असणार आहे. हा वर्ग सायंकाळी पाच ते आठ या वेळेत चालवण्यात येणार असून ग्रंथालयशास्त्र आणि त्याची उपयुक्तता यावर आधारित असणार आहे. या वेळी अनुभवी आणि या विषयातील तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. ग्रंथालय सेवक आणि ग्रंथालय रसिक यांच्यासाठी हा वर्ग उपयुक्त ठरतो. यासाठी वयाची अट नसून किमान दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.