Fri, March 31, 2023

डोंबिवलीत गजानन महाराज प्रकट दिन साजरा
डोंबिवलीत गजानन महाराज प्रकट दिन साजरा
Published on : 14 February 2023, 11:18 am
डोंबिवली, ता. १४ (बातमीदर) : गिरीजा सभागृह सावरकर रोड येथे गजानन महाराज प्रकटदिनाचा उत्सव पार पडला. प्रकट दिनानिमित्त आयोजित सार्वजनिक पारायण करण्यासाठी भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. दुपारी १२ वाजता आरतीसाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. तसेच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावून महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर आरती व मंत्राचा जागर करण्यात आला.