उल्हासनगरात निधी वाटपात दुजाभाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात निधी वाटपात दुजाभाव
उल्हासनगरात निधी वाटपात दुजाभाव

उल्हासनगरात निधी वाटपात दुजाभाव

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. १४ (वार्ताहर) : विकासकामांच्या निधीवाटपावरून नगरसेवकांमध्‍ये दुजाभाव करण्यात येत असून, भाजप नगरसेवकांना डावलले जात असल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला. आयुक्त अजीज शेख व इतर अधिकाऱ्यांशी बोलताना ते कमालीचे संतप्त झाले.

आक्रमक म्‍हणून ओळखले जाणारे आमदार गणपत गायकवाड यांनी निधीबाबत कशा प्रकारे दुजाभाव करण्यात येतो, याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. भाजपचे माजी नगरसेवक हे १० ते १५ लाखांचा विकासनिधी मागतात. यासाठी निविदा प्रक्रिया असून त्यात भ्रष्टाचार करण्यास वाव नाही. त्यामुळे हा निधी मंजूर करण्यासाठी चालढकलपणा करताना इतर पक्षाच्या नगरसेवकांच्या पाच ते आठ लाखाच्या निधीला तत्काळ मंजुरी देणारे उल्हासनगर पालिकेचे अधिकारी भ्रष्टाचाराचे धोरण राबवत असल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी करून बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांवर निशाणा साधला. आमदार कुमार आयलानी आणि गणपत गायकवाड यांनी भाजपच्या शिष्टमंडळासोबत आयुक्त अजीज शेख यांची भेट घेतली. पाण्याचे अमाप बिल आणि त्यावरील व्याजासाठी पाण्याची अभय योजना लागू करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष जमनू पुरसवानी, माजी स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, टोनी शिरवानी, माजी नगरसेवक लाल पंजाबी, शेरी लुंड, प्रदीप रामचंदानी, राजू जग्यासी, पदाधिकारी अमर लुंड, दीपक छतलानी, नीलेश बोबडे आणि अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, डॉ. करुणा जुईकर आदी अधिकारी उपस्थित होते.
--------------------------------------------------
विविध विषयांवर चर्चा
आठ वर्षांसाठी काढण्यात आलेल्या २७० सफाई कामगारांच्या नेमणुकीची निविदा रद्द करून ती एका वर्षाकरिता करण्यात यावी, डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न मार्गी लावावा, गार्डनची साफसफाई नियमितपणे करावी, टू व्हिलर असोसिएशनच्या गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी आणि नगरसेवकांच्या निधीबाबतची चर्चा करण्यात आली. त्यावर आयुक्त अजीज शेख यांनी सकारात्मक आश्वासन दिले.
-----------------------------------
उल्‍हासनगर : विकास निधी आणि विविध विषयांवर आयोजित बैठकीत आयुक्त अजीज शेख यांच्यासोबत चर्चा करताना आमदार गणपत गायकवाड, आमदार कुमार आयलानी.