जिल्हा परिषदेतर्फे क्रीडा स्पर्धा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषदेतर्फे क्रीडा स्पर्धा उत्साहात
जिल्हा परिषदेतर्फे क्रीडा स्पर्धा उत्साहात

जिल्हा परिषदेतर्फे क्रीडा स्पर्धा उत्साहात

sakal_logo
By

पालघर, ता. १५ (बातमीदार) पालघर जिल्हा परिषदतर्फे आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.
क्रीडा स्पर्धा पालघर येथील क्रीडा संकुलात तर सांस्कृतिक कार्यक्रम सोनोपंत दांडेकर महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, उपाध्यक्ष पंकज कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर, महिला व बालकल्याण समिती सभापती रोहिणी शेलार, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे, आरोग्य व बांधकाम समिती सभापती संदेश ढोणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या उपस्थितीत क्रीडा स्पर्धा व कार्यक्रम पार पडले. कबड्डी, खो-खो, क्रिकेट, धावणे, संगीत खुर्ची, कॅरम, बॅडमिंटन, बुद्धिबळ, रस्सीखेच अशा विविध प्रकारच्या स्पर्धा या वेळी पार पडल्या. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गीतगायन, नृत्य, नृत्य नाटिका, समूह गायन, समूह नृत्य, रॅम्प वॉक इत्यादी स्पर्धांचा समावेश होता. स्पर्धेत डहाणू पंचायत समिती चॅम्पियन ट्रॉफीचे मानकरी ठरले.