ठाण्यातील रंगरंगोटीच्या कामावर आव्हाडांचे ताशेरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातील रंगरंगोटीच्या कामावर आव्हाडांचे ताशेरे
ठाण्यातील रंगरंगोटीच्या कामावर आव्हाडांचे ताशेरे

ठाण्यातील रंगरंगोटीच्या कामावर आव्हाडांचे ताशेरे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १५ : मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका अधिकाऱ्यांवर ट्विट करत निशाणा साधत आहेत. त्यातच आता, ठाणे शहरात पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या रंगरंगोटीबाबत ट्विट करीत ताशेरे ओढले आहेत. रंगरंगोटीची जी निविदा काढण्यात आली आहे, त्यात ज्या काही अटी-शर्तींनी कामे होणे अपेक्षित होते, त्यानुसार कामे न होता केवळ थुकपट्टी लावली जात असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे हे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.
कळवा उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला असल्याचे दिसून येत आहे. अशातच विकासकामांच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. शहरात सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामावर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. शहरात सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या आणि रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार शहरात ही कामे सुरू आहेत; परंतु असे असतानाच रंगरंगोटीच्या कामावरून आव्हाड यांनी ट्टिट करून महापालिकेवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये ‘सध्या ठाण्यामध्ये रंगरंगोटीचे काम जोरदार सुरू आहे; पण मुळात निविदेमध्ये ज्या अटी व शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत; त्यामध्ये संपूर्ण भिंत खरवडून घेऊन त्याच्यावर पांढरा रंग देऊन तसेच परत एकदा रंगाचा हात मारत मगच जी काही रंगरंगोटी करायची आहे ती करावी, असे असताना, इथे मात्र तसे काहीही न करता सरळ भिंतीवर रंगकाम केले जात आहे. पावणेचारशे कोटी रुपयांची ही निविदा असल्याचे समजते. हे टेंडर कोणाच्या मेहरबानीवर मिळाले आणि कोण करीत आहे. त्यातही अशी थुकपट्टीची कामे का होत आहेत, याकडेच लक्ष आहे की नाही. आतापर्यंत रंगरंगोटी झालेली सगळी कामे ही थुकपट्टीचीच आहेत. कमीत-कमीत यापुढे तरी निविदेनुसार कामे होतील, हीच अपेक्षा,’ असे आव्हाडांनी नमूद केले आहे.