मध्य रेल्वेवर ५२ उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेवर ५२ उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या
मध्य रेल्वेवर ५२ उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या

मध्य रेल्वेवर ५२ उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कानपूरदरम्यान २६ साप्ताहिक विशेष गाड्या आणि पुणे ते वीरांगना राणी लक्ष्मीबाई जंक्शन दरम्यान २६ साप्ताहिक अशा एकूण ५२ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०४१५२ स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ८ एप्रिल ते १ जुलैपर्यंत दर शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.२५ वाजता कानपूर सेंट्रलला पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०४१५१ स्पेशल कानपूर सेंट्रल येथून ७ एप्रिल ते ३० जूनपर्यंत दर शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २.५५ वाजता पोहोचेल.
०१९२१ स्पेशल पुणे येथून ६ एप्रिल ते २९ जूनपर्यंत दर गुरुवारी सुपारी ३.१५ वाजता सुटेल आणि वीरांगणा राणी लक्ष्मीबाई जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१९२२ स्पेशल वीरांगणा राणी लक्ष्मीबाई जंक्शन येथून ५ एप्रिल ते २८ जूनपर्यंत दर बुधवारी रात्री १२.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३५ वाजता पुणे येथे पोहोचेल. या दोन्ही गाड्या दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नर्मदापुरम, भोपाळ, विदिशा, बिना आणि ललितपूर थांबणार आहे. या ५२ उन्हाळी विशेष रेल्वे गाड्याचे आरक्षण १७ फेब्रुवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.