विवाहित महिलेची कोयत्याने हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवाहित महिलेची कोयत्याने हत्या
विवाहित महिलेची कोयत्याने हत्या

विवाहित महिलेची कोयत्याने हत्या

sakal_logo
By

मुरबाड, ता. १६ (बातमीदार) : मुरबाड शहरातील एका घरात घुसून दिवसाढवळ्या विवाहित महिलेवर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात तिची सात वर्षाची मुलगी व महिलेचा आरडाओरडा ऐकून त्यांना सोडविण्यासाठी आलेला सुरक्षारक्षक जखमी झाला असून, हल्लेखोर पसार झाला आहे
चंदना बांगर असे मृत महिलेचे नाव आहे. जखमी मुलीचे नाव वैष्णवी बांगर तर जखमी सुरक्षा रक्षकाचे नाव पन्नालाल यादव असे आहे. मुरबाड शहरातील डोहाळे पाडा भागात ही घटना घडली. या महिलेच्या घरामध्ये भरत हरड ही व त्याने व्‍यक्‍ती आली. त्‍याने महिलेच्या अंगावर कोयत्याने सपासप वार केले. त्यावेळी घरामध्ये असलेली तिची लहान मुलगी वैष्णवी हिला सुद्धा जखमी करण्‍यात आले. महिलेने आरडाओरडा केल्याने त्यांना सोडविण्‍यासाठी आलेला सुरक्षारक्षक यादव यालासुद्धा वार करून जखमी करण्‍यात आले. या हल्‍ल्‍यात चंदना मृत झाली असल्‍याचे पोलिसांनी सांगितले.