Sat, April 1, 2023

मुंबईत विमानतळावरून ८४ कोटींचे हेरॉईन जप्त
मुंबईत विमानतळावरून ८४ कोटींचे हेरॉईन जप्त
Published on : 16 February 2023, 11:29 am
मुंबई, ता. १६ : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागाने विमानतळावरून एका भारतीय महिला प्रवाशाकडून ११.९४ किलो हेरॉईन हा अमली पदार्थ जप्त केला. त्यांची किंमत अंदाजे ८४ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हिरॉईन घेऊन आलेल्या महिला प्रवाशासह दोन जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. डीआरआय मुंबईने गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी केनिया एअरवेजच्या विमानाने झिम्बाब्वेच्या हरारेहून नैरोबीमार्गे मुंबईत महिला अमली पदार्थ घेऊन आली होती. तिच्या सामानाची तपासणी केली असता सामानात हेरॉईन आढळले. हे अमली पदार्थ तिला हरारे येथे देण्यात आले असून ते मुंबईतील दोन पुरवठादारांना देण्यात येणार असल्याची माहिती तिने अधिकाऱ्यांना दिली.