खारघर येथे खाजगी प्रवाशी बस जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघर येथे खाजगी प्रवाशी बस जळून खाक
खारघर येथे खाजगी प्रवाशी बस जळून खाक

खारघर येथे खाजगी प्रवाशी बस जळून खाक

sakal_logo
By

नवी मुंबई, ता.१६ (वार्ताहर) : सानपाडा येथून सांगली येथे जाणाऱ्या खाजगी टुर्स अॅन्ड ट्रॅव्हॅल्सच्या बसला आग लागल्याची घटना बुधवारी रात्री मुंबई-पुणे मार्गावर खारघर कोपरा येथे घडली. यावेळी बस चालकाने ४९ प्रवाशांना त्यांच्या सामानासह बसमधुन बाहेर काढल्याने या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. मात्र या आगीत संपूर्ण बस जळुन खाक झाली. या आगीची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी अग्निशमन दलासह घटनास्थळी धाव घेतली. ही बस जोतिर्लिंग कृपा ट्रॅव्हेल्सची असून ती सानपाडा येथून सांगली चांदोली येथे ४९ प्रवाशांना घेऊन जात होती. रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास खारघर कोपरा येथील ब्रिजजवळ बसच्या इंजिनमधून ठिणग्या येत असल्याचे बसचालक प्रशांत सोनवणे याच्या निदर्शनास येताच त्याने प्रसंगावधान दाखवत बसमधील सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह बाहेर काढले. त्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतला. खारघर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग अर्ध्या तासात आटोक्यात आणली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.