Wed, March 22, 2023

चराई परिसरात सोसायटीच्या मीटरबॉक्सला आग
चराई परिसरात सोसायटीच्या मीटरबॉक्सला आग
Published on : 16 February 2023, 3:13 am
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : सेंट जॉन स्कूलच्या समोरील तळ अधिक ३ मजली गुरूप्रेरणा या इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या मीटर बॉक्स रूममध्ये गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. या आगीमध्ये इमारतीमधील १३ जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत त्यांची सुखरूप सुटका केली. जवळपास दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.