
खा. शरद पवारांचे निकटवर्तीय अनिरुद्ध देशपांडे यांच्या रोहा केळतवाडी येथील मालमत्तेवर आयकर विभागाची धाड
अनिरुद्ध देशपांडे यांच्या
मालमत्तेवर प्राप्तिकरचा छापा
रोहा, ता. १६ (बातमीदार) ः बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांच्या रोह्यानजीकच्या केळतवाडी येथील मालमत्तेवर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी (ता. १६) छापेमारी केली. दरम्यान, बुधवारी देशपांडे यांच्याशी संबंधित पुण्यातील कार्यालय आणि निवासस्थानासह सहा ठिकाणी तपासणी करण्यात आली होती.
देशपांडे हे ‘सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक असून ‘लवासा’ प्रकल्पात देशपांडे यांचादेखील सहभाग होता. देशपांडे यांच्याशी संबंधित कंपनीने रोहा तालुक्यात शेकडो एकर जमीन खरेदी केली आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून प्राप्तिकर विभागाने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. देशपांडे यांच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात बांधकाम केले जात आहे. दरम्यान, आज सुमारे १४ वाहनांनी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी पाहणी केली.