Thur, March 30, 2023

प्राप्तिकरची बीबीसीतील
सर्वेक्षण मोहीम समाप्त
प्राप्तिकरची बीबीसीतील सर्वेक्षण मोहीम समाप्त
Published on : 16 February 2023, 6:13 am
मुंबई, ता. १६ : मुंबईतील बीबीसी कार्यालयात प्राप्तिकर विभागाचे तपासणी सर्वेक्षण अखेर ५९ तासानंतर गुरुवारी (ता. १६) रात्री १० वाजता संपले. मंगळवारी (ता. १४) सकाळपासून प्राप्तिकरच्या अधिकाऱ्यांनी बीबीसी कार्यालयात सर्वेक्षण केले. दरम्यान, अधिकाऱ्यांनी बीबीसी कार्यालयातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
प्राप्तिकर विभागाचे चारसदस्यीय पथक मंगळवारी सकाळी वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयात दाखल झाले. अधिकाऱ्यांनी बीबीसीच्या करसंबंधातील दस्तऐवजांची तपासणी केली; तसेच सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेतली. कर्मचाऱ्यांचे मोबाइल फोनही तपासल्याची माहिती मिळत आहे.