Tue, March 21, 2023

वणव्यात घरासह केळीची बाग बेचिराख
वणव्यात घरासह केळीची बाग बेचिराख
Published on : 17 February 2023, 4:21 am
वाडा, ता. १७ (बातमीदार) : तालुक्यातील गारगाव येथील आगीत शेतकऱ्याचे घर आणि केळीची बाग जळून खाक झाली आहे. आगीची ही घटना गुरुवारी (ता. १७) दुपारी लागलेल्या वणव्यामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात तुळशीराम कुटे या शेतकऱ्याला आज (ता. १८) सायंकाळपर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही. तसेच पाहणी करण्यासाठी प्रशासनाकडून कोणीही पोहोचला नसल्याचे त्यांनी सांगितले.