झेडपीला कुटुंब समजून काम करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झेडपीला कुटुंब समजून काम करा
झेडपीला कुटुंब समजून काम करा

झेडपीला कुटुंब समजून काम करा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : आपली जिल्हा परिषद एक कुटुंब आहे, असे समजून काम करा व एकमेकांना सहकार्य करण्याबरोबरच स्वतःला अद्ययावत करत रहा. दिवसातले दोन तास तरी आवडीच्या गोष्टी करण्यात घालवा, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी मनुज जिंदल यांनी व्यक्त केले. ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कलाविष्कार महोत्सवात ते बोलत होते.
ठाणे जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी कलाविष्कार महोत्सव २०२३ हा मोठ्या उत्साहात पार पाडला. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनुज जिंदल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले. जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी कलाविष्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गेली दोन वर्षे कोराना महामारीमुळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले गेले नव्हते. यंदा जल्लोषाने कलाविष्कार महोत्सव साजरा केला गेला. या वेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिंदाल यांनी मार्गदर्शन केले.

-----------------
स्पर्धेतील विजेते
गायन स्पर्धेचे विजेते प्रथम प्रवित्रा सुतार, द्वितीय श्रृतीका पटारे, तृतीय संदेश म्हस्के; नृत्य स्पर्धेत प्रथम पूनम बागले, द्वितीय मुकेश सोलंकी, तृतीय रसिका कुलकर्णी; सामुहिक नृत्य प्रथम गट अ अंबरनाथ, द्वितीय गट ब भिवंडी, तृतिय गट क कल्याण; फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्रथम जगदीश पाटील, द्वितीय मनिष जाधव, तृतिय नितीन गाढे; नाट्य स्पर्धेत प्रथम उषा लांडगे, द्वितीय मनिषा खंदारे, तृतीय सुप्रिया देशमुख आदी विजयी झाले. विजेत्या स्पर्धकांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आले.