वस्त्रोद्योग धोरणासाठी समिती गठीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वस्त्रोद्योग धोरणासाठी समिती गठीत
वस्त्रोद्योग धोरणासाठी समिती गठीत

वस्त्रोद्योग धोरणासाठी समिती गठीत

sakal_logo
By

भिवंडी, ता. १८ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्यातील वस्त्रोद्योग आणि त्यांच्या गरजांविषयी शिफारशी सादर करण्यासाठी शासनाने तसेच प्रस्तावित वस्त्रोउद्योगम धोरण २०२३-२८ साठी उपाययोजना प्रस्तावित करणेसाठी वस्त्रोद्योग आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गाठीत केली आहे. त्यामध्ये भिवंडीच्या आमदारांसह तीन सदस्यांची नियुक्ती केल्याने भिवंडीकर नागरिकांनी स्वागत केले आहे. भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहे.
राज्यात मोठ्या संख्येने वस्त्रोद्योग व व्यापार हा भिवंडी शहर आणि परिसरात असल्याने या वस्त्रोउद्योग व्यसायामुळे भिवंडी पावरलूम सिटी म्हणून ओखळले जाते. राज्याच्या आर्थिक संरचनेमध्ये वस्त्रोउद्योग क्षेत्राची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. कृषि व्यसायानंतर या उद्योगामाध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्माण होण्याची क्षमता आहे. ही बाब विचारात घेऊन राज्यशासनाने महाराष्ट्र राज्याचे प्रस्तावित वस्त्रोउद्योगम धोरण २०२३-२८ साठी उपाययोजनेसाठी समिती प्रस्तावित केली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रस्तावित वस्त्रोउद्योगम धोरण २०२३-२८ साठी उपाययोजना प्रस्तावित करणेसाठी भिवंडी पूर्व विधानसभेचे आमदार रईस शेख, पुनीत खेमसीया, राजेंद्र वासम या भिवंडीतील मान्यवरांची सदस्यपदी नियुक्ती शासनाने केली आहे.