कळवा खारेगावमध्ये शिवभक्तांच्या दर्शनासाठी रांगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळवा खारेगावमध्ये शिवभक्तांच्या दर्शनासाठी रांगा
कळवा खारेगावमध्ये शिवभक्तांच्या दर्शनासाठी रांगा

कळवा खारेगावमध्ये शिवभक्तांच्या दर्शनासाठी रांगा

sakal_logo
By

कळवा, ता. १८ (बातमीदार) : कळवा परिसरातील आनंदनगरमधील शंकर मंदिर, कळव्यातील सिद्धेश्वर मंदिर व खारेगाव तलावाजवळील अर्णेश्वर मंदिरात शिवरात्रीनिमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या सर्व ठिकाणी शुक्रवारी रात्री फुलांची व विजेच्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. मंदिरांबाहेर सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. शिवरात्रीनिमित्ताने खारेगाव येथील अर्णेश्वर मंदिरात व कळवा पूर्व आनंदनगर प्राचीन शिमंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम व जागर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवरात्रीनिमित्त या परिसरात जत्रेचे स्वरूप निर्माण झाले होते. या जत्रेत लहान मुलांची खेळणी, खाऊ व संसारोपयोगी वस्तूंचा समावेश होता. काही सामाजिक संस्थांच्या वतीने पिण्याचे पाणी, सरबत व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.