Thur, March 23, 2023

पोलादपूरमध्ये फटाके फोडून जल्लोष
पोलादपूरमध्ये फटाके फोडून जल्लोष
Published on : 18 February 2023, 1:04 am
पोलादपूर (बातमीदार) : काही महिन्यांपासून शिवसेना कोणाची? हा वाद सुरू होता. मात्र, शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह हे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरात शिवसैनिकांच्या वतीने जल्लोष करण्यात आला. पोलादपूर शहरामध्येही निकाल मिळाल्यानंतर शिवसैनिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन फटाके फोडून आनंद व्यक्त केला.