आरोपीची निर्दोष मुक्तता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोपीची निर्दोष मुक्तता
आरोपीची निर्दोष मुक्तता

आरोपीची निर्दोष मुक्तता

sakal_logo
By

ठाणे, ता. १८ (वार्ताहर) ः एका महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असणाऱ्या आरोपीला सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले आहे. ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ. रचना आर. तेहरा यांनी हा निकाल दिला.

२६ फेब्रवारी २०१६ रोजी भाईंदर येथे एका ज्वेलर्सच्या पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली होती. मृत महिला आणि आरोप आकाश भंडारी यांचा परिचय होता. महिलेचा मृत्यू होण्याआधी काही दिवस अगोदर तिचे भंडारी याच्याशी भांडण झाले होते, अशी माहिती महिलेच्या मुलाने आपल्या वडिलांना दिली. त्यामुळे महिलेच्या आत्महत्येस भंडारी जबाबदार असल्याची तक्रार महिलेच्या पतीने केली होती. पण, दोघांमध्ये कुठल्या कारणावरून भांडण झाले, हे न्यायालयात स्पष्ट झाले नाही. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.