महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य
महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य

महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ ः महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या तसेच विविध संस्थांच्या साह्याने आर्थिक मदत आणि प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन कांदिवलीचे भाजप आमदार अतुल भातखळकर तसेच बोरिवलीच्या माजी शिवसेना नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांनी केले आहे.
भातखळकर यांच्या पुढाकाराने कांदिवली (पूर्व) येथे स्पंदन सामाजिक प्रतिष्ठान, कोसिया आणि टिसा या संस्थांतर्फे महिलांना ॲडव्हान्स टेलरिंग, ब्युटी पार्लर व बेकरी उत्पादनांचे प्रशिक्षण देण्यात आले. नुकताच या अभ्यासक्रमाचा प्रमाणपत्र वाटप आणि बक्षीस वितरण समारंभ झाला. त्या वेळी त्यांनी महिलांना स्वयंपूर्ण होण्याचे आवाहन केले. या प्रशिक्षणाचा उपयोग महिलांनी घरापुरताच करू नये, तर व्यावसायिक उपयोग करून आपली उन्नती करावी, असे आवाहनही भातखळकर यांनी केले.
महापालिकेच्या जेंडर बजेट अंतर्गत, महिला व बालकल्याण योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी घरघंटी, शिलाई मशीन, मसाला दळण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी थेट अर्थसाह्य देण्यात येते. त्याच्या अधिक माहितीसाठी आणि फॉर्म मिळण्यासाठी बोरीवलीच्या प्रभुत्व एज्युकेशन मेडिकल ट्रस्ट (काजूपाडा) येथे संपर्क साधावा, असे आवाहन रिद्धी भास्कर खुरसंगे यांनी केले आहे.

केशरी शिधापत्रिकाधारक, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित, ४० वर्षांवरील अविवाहित महिला, गिरणी कामगार, देवदासी, दारिद्र्यरेषेखालील महिला, सर्वसाधारण गटातील महिला तसेच कोविड आजाराने पतीचे निधन झालेल्या विधवा यांना या योजनेचा लाभ मिळेल. योजनेचे अर्ज महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयात २३ फेब्रुवारीपर्यंत स्वीकारले जातील.
– रिद्धी खुरसंगे, माजी नगरसेविका