सामाजिक जागृतीचा संदेश देत धावले तीन हजार स्पर्धक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामाजिक जागृतीचा संदेश देत धावले तीन हजार स्पर्धक
सामाजिक जागृतीचा संदेश देत धावले तीन हजार स्पर्धक

सामाजिक जागृतीचा संदेश देत धावले तीन हजार स्पर्धक

sakal_logo
By

वसई, ता. १९ (बातमीदार) : मानसिक स्वास्थ्य, अमली पदार्थ सेवनास बंदी, ट्रान्सजेंडर कम्युनिटी, निसर्ग संरक्षणाबाबत जनजागृती करत तीन हजार स्पर्धकांनी विरार रनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या वेळी स्थायी समितीचे माजी सभापती जितूभाई शहा, माजी सभापती अजीव पाटील यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला.
विरार रनचे अमेय क्लासिक क्लब, विराट मित्र मंडळ, विराट फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खेलो इंडिया सुवर्णपदक विजेती इशा जाधव, अजीव पाटील, जितुभाई शहा, माजी नगरसेवक हार्दिक राऊत, प्रशांत चौबळ, अजय संघवी, सुरेखा कुरकुरे, रिटा सरवय्या, सीमा काळे, ज्योती राऊत, नॅशनल एज्युकेशन ट्रस्टचे दीपक कुलकर्णी, प्रभाग समितीचे माजी सभापती सखाराम महाडिक यांच्यासह विराट नगर मित्र मंडळ, पुष्पा नगर मंडळ, म्हाडा रहिवासी संघ, अमेय क्लासिक क्लब, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, बहुजन विकास आघाडी व युवा विकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१० किमी दौड विरार पश्चिम अमेय क्लासिक क्लब येथून सुरु झाली. ही दौड विराट नगर, जकात नाका, म्हाडा या मार्गाने पुन्हा अमेल क्लासिक क्लब येथे तिची सांगता झाली. तर १० ते १६ वयोगटांतील मुलामुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. तीन, दीड आणि एक किमी आणि फन रनचेदेखील आयोजन करण्यात आले होते. मुलांमध्ये प्रथम नीलेश अर्सेकर; तर द्वितीय निखी सिंग व तृतीय दीपक राजभर व मुलींमध्ये प्रथम निकिता मराळे, द्वितीय कलावती धांगडा, तृतीय मिंजी नदाफ हे विजेते ठरले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
---------------------
विशाल डान्स ग्रुपचे आकर्षण
विरार येथे पार पडलेल्या विरार रनप्रसंगी विशाल डान्स ग्रुपने शिवजयंती उत्सवानिमित्त महाराष्ट्र संस्कृतीचा इतिहास नृत्यातून साकारला. यावेळी उपस्थित नागरिकांनी भरभरून दाद दिली असल्याचे पाहावयास मिळाले.
--------------------
शारीरिक व मानसिकरित्या प्रत्येकाने सुदृढ राहण्यासाठी व्यायाम, चालणे, धावण्याकडे लक्ष दिले पाहिजे. फास्ट फूडमुळे आजार बळावत असतात. अशा पदार्थांपासून दूर राहावे विरार रन मधून खेळाडूंना प्रोत्साहन व सामाजिक जागृती हा उद्देश ठेवण्यात आला होता.
- हार्दिक राऊत, आयोजक तथा माजी नगरसेवक