Fri, March 24, 2023

डॉ. आदिती हिंगे-पाटील यांना सुवर्णपदक
डॉ. आदिती हिंगे-पाटील यांना सुवर्णपदक
Published on : 19 February 2023, 10:27 am
विरार, ता. १९ (बातमीदार) : वसईतील डॉ. आदिती हिंगे-पाटील यांनी एमडी (मानसोपचारतज्ज्ञ) ही पदव्युत्तर पदवी परीक्षा सुवर्णपदकासह उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी आयोजित केलेल्या विशेष गुणवत्ताप्राप्त डॉक्टरांच्या सत्कारात आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते डॉ. आदिती हिंगे-पाटील यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. डॉ. आदिती हिंगे-पाटील या वसईतील कोविडयोद्धा स्व. डॉ. हेमंत पाटील आणि डॉ. शुभांगी पाटील यांच्या स्नुषा असून डॉ. साकेत हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत. राज्यातून पहिल्या येणाऱ्या डॉ. आदिती यांचे माजी महापौर प्रवीण शेट्टी तसेच अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.