विक्रमगड आराखडा आक्षेपावर आजपासून सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगड आराखडा आक्षेपावर आजपासून सुनावणी
विक्रमगड आराखडा आक्षेपावर आजपासून सुनावणी

विक्रमगड आराखडा आक्षेपावर आजपासून सुनावणी

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १९ (बातमीदार) : विक्रमगड नगरपंचायतीमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप विकास योजना आराखड्यासंदर्भात घेतलेला आक्षेप व हरकतींवर २० ते २४ फेब्रुवारी या कालावधीत नगरपंचायत कार्यालय विक्रमगड येथे वैयक्तिक सुनावणी आयोजित करण्यात आली आहे.
प्रारूप विकास योजना आराखडा हा अद्याप शासनामार्फत मंजूर करण्यात आलेला नाही. नागरिकांच्या प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून शासनामार्फत स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या याबाबतचा अहवाल विचारात घेऊन शासन विकास योजना आराखडा मंजूर करणार आहे. त्यामुळे या समितीसमोर सर्व हरकतदार यांनी वैयक्तिक म्हणणे मांडण्याबाबत नगरपंचायत मुख्याधिकारी अजय साबळे यांनी आवाहन केले आहे. नागरिकांच्या हरकती व सूचनांची वैयक्तिक सुनावणी घेण्याकरता स्थापन केलेल्या समितीत नगररचना विभागाचे ज्ञान असणारे चार सदस्य व नगर पंचायतीच्या स्थायी समितीचे तीन सदस्य असणार आहेत. या समितीसमोर ९६७ हरकतदारांनी आपले आक्षेप व सूचना मांडावी, असे विक्रमगड नगरपंचायतीमार्फत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.