शिवाजी बालक मंदिरात शिवरायांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी बालक मंदिरात शिवरायांना अभिवादन
शिवाजी बालक मंदिरात शिवरायांना अभिवादन

शिवाजी बालक मंदिरात शिवरायांना अभिवादन

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १९ (बातमीदार) : शिवजयंतीनिमित्त शिवाई बालक मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्यात्या डॉ. प्राची दामले व माजी विद्यार्थिनी श्रद्धा नेमाने यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. डॉ. प्राची दामले यांनी व्याख्यानात विविध दाखले देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीबद्दल सांगितले. आरमाराचे महत्त्व, राज्य व्यवहार, कोश तयार करण्यामागची दूरदृष्टी, आज्ञापत्रात शिवरायांनी सैनिकांना दिलेल्या सूचना, पर्यावरणाचे महत्त्व व स्त्रियांचा सन्मान, जिजाऊंनी शिवरायांना दिलेली शिकवण याविषयी सखोल माहिती दिली. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांची ओळख व स्वागत केले. विद्यार्थिनी आर्या सावंत हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सहशिक्षिका घाडगे यांनी आभार मानले.