Sat, March 25, 2023

कासात शाहिरीतून शिवप्रबोधन
कासात शाहिरीतून शिवप्रबोधन
Published on : 19 February 2023, 12:04 pm
कासा, ता. १९ (बातमीदार) : कासा, चारोटी, सूर्यानगर परिसरात मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपतींचा मावळा प्रतिष्ठानतर्फे कासा येथील शिवशक्ती मैदानात तीन दिवसापासून शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत. यामध्ये वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. भांडुप येथील पोलिस निरीक्षक प्रवीण फणसे यांच्या दोन लहान मुलांसह शाहिरी व पोवाड्याचा कार्यक्रम सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध घटना सांगून प्रबोधन करण्यात आले. सकाळी कासा ते चारोटीपर्यंत भगवे ध्वज लावून बाईक रॅली काढण्यात आली. सूर्यानगर येथील शिवजयंती उत्सवात कासा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून शिवाजी महाराजांबद्दल मौलिक माहिती दिली.