
गोवंशाची कत्तल करणाऱ्या तिघा आरोपींना बेड्या
पोलादपूर, ता. १९ (बातमीदार): गत रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तालुक्यातील वावे येथे एका नर जातीच्या गोवंशाची कत्तल केल्याची घटना उघजकीस आली. याबाबतची माहिती नरवीर रेस्क्यु पथकाचे दीपक उतेकर व त्यांचे सहकारी दिनेश दरेकर, राहुल जाधव, सुमित दरेकर, जयेश जगताप, सागर साळुंखे, दीपक शिंदे, उमेश पालकर, प्रतीक मोहिते यांना मिळाल्यानंतर या पथकाने धाड टाकत हा सर्व प्रकार उघडकीस आणला. या गोवंशाची कत्तल ही विक्रीसाठी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. वावे मोहल्ला येथील अब्दुल करीम अलीमिया तांबे, मोहम्मद अब्दुल मिया तांबे, फयाझ इस्माईल काझी या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलादपूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विनोद महाडिक, स्वप्निल कदम, इकबाल शेख हे करीत आहेत.