अवैध टेलिफोन एक्सचेंज चालवणारा एटीएस ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध टेलिफोन एक्सचेंज चालवणारा एटीएस ताब्यात
अवैध टेलिफोन एक्सचेंज चालवणारा एटीएस ताब्यात

अवैध टेलिफोन एक्सचेंज चालवणारा एटीएस ताब्यात

sakal_logo
By

भिवंडी,ता. १९ (बातमीदार): शहरातील कारिवली ग्रामपंचायतहद्दीत भैरव डाईंगजवळ इमारतीत सुरू असलेल्या अवैध टेलिफोन एक्सचेंजच्यावर ठाणे दहशदवाद विरोधी पथकाने धाड टाकत एकाला अटक केली आहे.
केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाच्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय कॉल हे सर्वसाधारणपणे टेलिफोन नेटवर्कमधून पाठवण्यासाठी दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील टेलिकम्युनिकेशन विभागाची परवानगी आवाश्‍यक असते. ही शासकीय परवानगी न घेता कारिवली-भंडारी कंपाउंड येथील भैरव डाईंगजवळ स्काय अपार्टमेंट या इमारतीत तरबेज सोहराब मोमीन हा अवैधरित्या टेलिफोन एक्सचेंज चालवून त्याच्याजवळील उपकरणाद्वारे येथील नागरिकांना आंतरराष्ट्रीय कॉल जोडून देत होता. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता. सोबतच तरबेज मोमीन हा परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय कॉल त्याच्याजवळील उपकरणाद्वारे भारतातील इच्छित मोबाईल नंबरवर अनधिकृतरित्या राऊट करून (फिरवून) भारत सरकारची फसवणूक करत होता. याप्रकरणी तरबेज मोमीन याच्या विरोधात एटीएस विभागातील उपनिरीक्षक वर्षाराणी आजले यांनी भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहे.