भारती विद्यापीठाचे हिवाळी शिबिराचा जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारती विद्यापीठाचे हिवाळी शिबिराचा जल्लोष
भारती विद्यापीठाचे हिवाळी शिबिराचा जल्लोष

भारती विद्यापीठाचे हिवाळी शिबिराचा जल्लोष

sakal_logo
By

खारघर, ता. २० (बातमीदार) : येथील भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ९ ते १५ फेब्रुवारी दरम्यान पनवेलमधील भानघर गावात हिवाळी शिबिर पार पडले. या शिबिराचे उद्‍घाटन डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक डॉ. प्रेमाशीश रॉय आणि विभागप्रमुख डॉ. मोना सिंग यांच्या हस्ते झाले. शिबिरात विद्यार्थ्यांनी गावात स्वच्छता अभियान राबवली. या वेळी रस्ते, गटारे, मंदिर परिसराची स्वच्छता करून गावात रोपलागवड केली. या शिबिरात संविधानाचे महत्त्व, निसर्गोपचार, व्यसनमुक्ती, वेळ व अष्टांग योगाचे महत्त्व, प्रेम आणि युवा पिढीच्या समस्या; तसेच एड्स आजाराविषयी जागरूकता आदी विषयांवर अल्लाउद्दीन शेख, डॉ. चॅम्पियन बेगडी, मिलिंद पाटील, सुहास सावंत, डॉ. जाजम, महेंद्र नाईक, अरविंद पाटील आदींनी मार्गदर्शन केले. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी परिसरातील गावांमधील जिल्हा परिषद आणि आदिवासी शाळांना भेट देवून माहिती घेतली. शांतीवन येथील कुष्ठरोग निर्मूलन केंद्रालाही भेट देत कुष्ठरोग आजाराचे कारणे आणि त्यावर उपाय याविषयी माहिती घेतली. या शिबिरात सरपंच प्रकाश तांडेल सहभागी झाले होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. रामचंद्र पाटील, महेश बागवडे यांनी मेहनत घेतली.