Tue, March 28, 2023

शिवभक्त मावळे मंडळाकडून शिवरायांचा जागर
शिवभक्त मावळे मंडळाकडून शिवरायांचा जागर
Published on : 20 February 2023, 10:51 am
विक्रमगड, ता. २० (बातमीदार) : विक्रमगड येथील पाटील पाड्यात शिवभक्त मावळे मंडळामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विक्रमगड पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रदीप गीते, विक्रमगड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संजय आगीवले यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील, दिलीप जैन, शिवभक्त मावळे मंडळ संस्थापक अध्यक्ष पंकज पाटील, जिजाऊ संस्थेचे अमर भानुशाली, मुकेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.