Thur, March 30, 2023

अंबाडीत रक्तदान शिबिर
अंबाडीत रक्तदान शिबिर
Published on : 20 February 2023, 12:27 pm
वज्रेश्वरी, ता. २० (बातमीदार) : अंबाडी येथील द्रोणा फाऊंडेशन आणि राजमाता जिजाऊ कलामंचातर्फे शिवजन्मोत्सव उत्सवात साजरा करण्यात आला. यानिमित्त वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये १६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या वेळी अनेक मान्यवरांची व्याख्याने झाली. या वेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक तसेच यशस्वी युवकांचा सम्मान करण्यात आला. राजमाता जिजाऊ रुग्णालय अंबाडी येथे आरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.