
रेल्वे स्थानक परिसरात गुन्हेगारीत वाढ
कल्याण, ता. २१ (बातमीदार) : कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वेस्थानक परिसरात भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला आहे. मागील काही वर्षांत चोरीचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बल यंत्रणा अपयशी ठरल्याचे गुन्ह्याच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत कल्याण ते कसारा आणि कल्याण ते बदलापूर रेल्वे स्थानक येत असून पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याची देण्यात आली आहे. गुन्ह्यांची आकडेवारी पाहता चोरीचे प्रमाण तब्बल तिपटीने वाढल्याचे दिसून येत आहे. ही आकडेवारी केवळ नोंद असलेल्या गुन्ह्यांची आहे.नोंदी नसलेल्या घटना ही खुप प्रमाणात आहेत. रेल्वे अपघात अथवा चोरीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. दगडफेक, महिलांचे विनयभंग वाढल्याचे दिसून येते.
गुन्हे दाखल झालेली आकडेवारी
२०२१ २०२२ २०२३ (१८ फेब्रुवारीपर्यंत)
रेल्वे अपघातात मृत्यू - २८८ ३३४ ३७
मोबाईल, पर्स चोरी - ५३१ १५८३ २३९
दगडफेक - ०३ ०२ ०३
विनयभंग - ०५ ०५ ०२
रेल रोको - ०० ०२ ०१