ज्वारीच्या कणिसांनी सभा सजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्वारीच्या कणिसांनी सभा सजली
ज्वारीच्या कणिसांनी सभा सजली

ज्वारीच्या कणिसांनी सभा सजली

sakal_logo
By

पडघा, ता. २१ (बातमीदार) : तालुक्यातील पुंडास-मुर्हे-अवलोटे ग्रामपंचायत हद्दीत शेतकरी महिला बचतगट व शालेय विद्यार्थी यांच्यासाठी कृषी विभाग-भिवंडी यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. या वेळी तालुका कृषी अधिकारी भिवंडी गणेश बांबळे यांच्या हस्ते बळीराजा बैलजोडी व बैलगाडीचे पुजन करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी तालुका कृषी अधिकारी बांबळे यांनी उपस्थित महिला बचतगट व शेतकरी यांना आहारात असलेले तृणधान्याचे महत्त्व पटवून दिले.
या वेळी मंडळ कृषी अधिकारी राहुल शिरसाट यांनी पीएमएफएमई या योजनेची सविस्तर माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक विवेक दोंदे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना सांगून कार्यक्रमात सजवलेले ज्वारीच्या शिवाराचे उद्देश स्पष्ट केले. तसेच भाजीपाला लागवडीच्या विविध व्हिडीओ क्लिप दाखवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वर पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांनी कृषीपुरक व्यवसायासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. या प्रसंगी सरपंच मनीषा पवार, कृषी सहाय्यक स्नेहल वाळंज, अर्चना धलपे यांनी महिलांना हळदी-कुंकू करून ज्वारीचा उपमा नाष्टा म्हणून देऊन सन्मानित केले. या प्रसंगी कृषी सहाय्यक नूतन पाटील, नरेश बुजड, वैभव लाढी, मनीषा निळे, ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य संगीता जाधव व शेतकरी उपस्थित होते.