Sun, March 26, 2023

अनुकंपा भरतीचा प्रश्न मार्गी : प्रकाश निकम
अनुकंपा भरतीचा प्रश्न मार्गी : प्रकाश निकम
Published on : 21 February 2023, 11:49 am
पालघर, ता. २१ (बातमीदार) : येत्या दहा ते पंधरा दिवसात जिल्हा परिषदेचा प्रलंबित असलेला अनुकंपा भरतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या अनुकंपा भरतीच्या अनुषंगाने उमेदवाराने कुठलाही व्यवहार कोणाशाही करू नये, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले. २०१४ पासून जिल्हा परिषदेचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, लोकप्रतिनिधी मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच सद्याचे विद्यमान उपाध्यक्ष, सभापती लोकप्रतिनिधी मुख्य कार्यकारी, अधिकारी यांच्या प्रयत्नाने अनुकंपा भरतीचा प्रश्न मार्गी लागला असून ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणार आहे. अंतिम प्रतीक्षा सूचीतील ज्येष्ठता, शैक्षणिक अर्हता आणि रिक्त पदांनुसार उमेदवारांची नेमणूक केली जाईल, असे निकम यांनी स्पष्ट केले.