Sat, March 25, 2023

एनएसएसच्या राष्ट्रीय शिबिरात वसईचा यग्नेश शेणॉय
एनएसएसच्या राष्ट्रीय शिबिरात वसईचा यग्नेश शेणॉय
Published on : 22 February 2023, 11:11 am
वसई, ता. २१ (बातमीदार) : गुजरात येथे सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठात पार पडलेल्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरात वसईतून यग्नेश शेणॉय यांची निवड करण्यात आली होती. राज्यातील ११ स्वयंसेवकांपैकी वसईलादेखील मान मिळाला. वसईच्या संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात शेणॉय हा वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत असून शिबिरात गणेश वंदना, लावणी, लेझीम, कोळी नृत्याचे कला प्रदर्शन केले. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. रामदास तोंडे व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.