महिलांसाठी महापालिकेची स्मार्ट लेडी स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांसाठी महापालिकेची स्मार्ट लेडी स्पर्धा
महिलांसाठी महापालिकेची स्मार्ट लेडी स्पर्धा

महिलांसाठी महापालिकेची स्मार्ट लेडी स्पर्धा

sakal_logo
By

भाईंदर, ता. २१ (बातमीदार) : स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अभियानांतर्गत मिरा-भाईंदर महापालिकेने महिलांसाठी ‘स्मार्ट लेडी’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत लोकप्रिय अभिनेत्री व स्वच्छ सर्वेक्षणच्या ब्रँड ॲम्बेसेडर प्रिया मराठे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या स्पर्धेत महिलांसाठी स्वच्छतेविषयी मनोरंजन, खेळ, गप्पागोष्टी, स्वच्छतेविषयी जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे.
माझी वसुंधरा अभियान व सफाई मित्र सुरक्षा चॅलेंजअंतर्गत महापालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे व उपायुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २४ फेब्रुवारीला सायंकाळी ६.०० वाजता बाळासाहेब ठाकरे मैदानात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस म्हणून पैठणी, द्वितीय बक्षीस वॉटर प्युरिफायर व तृतीय बक्षीस केक ओव्हन देण्यात येणार आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी व मिरा भाईंदर शहरातील सर्व सामान्य नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी यासाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.