Tue, March 21, 2023

मॉडेल सपना गिलची
पृथ्वी शॉ विरोधात तक्रार
मॉडेल सपना गिलची पृथ्वी शॉ विरोधात तक्रार
Published on : 21 February 2023, 2:01 am
मुंबई, ता. २१ : मॉडेल सपना गिल आणि क्रिकेटपटू पृथ्वी शॉ यांच्यात सेल्फी काढण्यावरून सुरू झालेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. सपना गिलला जामीन मिळाल्यानंतर तिने क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशीष यादव यांच्याविरोधात सहार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सेल्फीवादानंतर सपना गिलसह तिच्या काही मित्रांनी पृथ्वीचा मित्र आशीष यादवच्या गाडीची काच फोडली होती. त्याबद्दल ओशिवरा पोलिसांनी सपनासह आठ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. सत्र न्यायालयाने सपनाला जामीन मंजूर केल्यानंतर लगेच तिने पृथ्वीविरोधात वकिलामार्फत विनयभंग तसेच मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.