Sat, March 25, 2023

मुरबाडला गढूळ पाणीपुरवठा
मुरबाडला गढूळ पाणीपुरवठा
Published on : 21 February 2023, 1:35 am
मुरबाड, ता. २१ (बातमीदार) : मुरबाड शहरातील नळाला सध्या पिण्याचे गढूळ पाणी येत असल्याने पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन मुरबाड नगर पंचायतीने केले आहे. मुरबाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिरावली धरणातील पाणीसाठा कमी होत चालल्याने धरणातील जॅकवेलजवळ खोली वाढवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पाणी गढूळ होत आहे. खोली वाढवण्याचे काम अजून एक दोन दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी केले आहे.