फळ बागेस आग लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फळ बागेस आग लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
फळ बागेस आग लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

फळ बागेस आग लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २२ (बातमीदार) : विक्रमगड-भावरपाडा येथील शेतकरी संतोष बापू पाटील यांनी त्यांच्या जागेमध्ये विविध फळझाडांची तसेच फुलझाडांची लागवड केली आहे. असे असताना काही दिवसांपूर्वी कुणीतरी या फळ व फूल बागेस आग लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत संतोष पाटील यांनी तहसीलदार, तलाठी, वन आणि कृषी विभागास तक्रार अर्ज सादर केला आहे. संतोष पाटील व त्यांचे कुटुंबीय बाहेर असताना त्या संधीचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांच्या फळ व फूल बागेस आग लावली आहे. त्यामध्ये जवळ जवळ ५० आंब्यांची कलमे तसेच काजू, चिकू, पेरू, सीताफळ व विविध फुलझाडे यांची मोठी हानी झाली आहे. त्यांनी पाण्याची सोय नसतानाही मेहनतीच्या जोरावर ही बाग फुलवली होती.