सृजनशील साहित्य संस्कृती खोलवर रुजते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सृजनशील साहित्य संस्कृती खोलवर रुजते
सृजनशील साहित्य संस्कृती खोलवर रुजते

सृजनशील साहित्य संस्कृती खोलवर रुजते

sakal_logo
By

वसई, ता. २२ (बातमीदार) : लेखक, कवी समाजाच्या सुख-दुःखाने, भावनांना शब्दरूप देत असतात. आपल्या जीवनाच्या वास्तवात जे प्रसंग घडतात त्यांची पुनर्रचना करून त्यात कल्पनांची नवी भर टाकतात. लेखकाने साधलेले समांतर वास्तव म्हणजे नवनिर्मिती असते. पण सृजनशील साहित्य संस्कृती जमिनीत खोलवर रुजते, असे प्रतिपादन लेखक रेमंड मच्याडो यांनी वसईत केले.
लेखिका फ्लॉरी रॉड्रिग्ज यांच्या ‘मर्मबंधातल्या सरी’ या कथा संग्रहाचे प्रकाशन ओरभाट, पापडी येथे अध्यक्ष रेव्ह. फा. जॉन फरगोज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरोज कोळी, फ्लॉरी रॉड्रिग्ज, झेविअर डिमेलो, शरद विचारे, फा. जॉन फरगोज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कथासंग्रहाचा गाभा त्यातून लेखिकेने मांडलेले विचार याचा आढावा यावेळी घेण्यात आला. मर्मबंधातल्या सरी’ या कथा संग्रहातून समाजजीवनाचा उलगडा केला आहे. लेखनात समाजाप्रती कळकळ व ममत्वाची भावना दिसत आहे. कथांमधून ज्वलंत समस्या मांडल्या आहेत, असे लेखक झेवियर डिमेलो यांनी स्पष्ट केले. लुईस फरोज व सरोज कोळी यांनी सूत्रसंचालन केले, तर लुसी रॉड्रिग्ज यांनी उपस्थितांचे आभार मानले.
---------------------
वसई : ‘मर्मबंधातल्या सरी’ कथा संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.