Sat, April 1, 2023

आलियाची फोटोग्राफर्स विरोधात तक्रार
आलियाची फोटोग्राफर्स विरोधात तक्रार
Published on : 22 February 2023, 5:44 am
आलियाची फोटोग्राफर्सविरोधात तक्रार
काही चटपटीत हाती लागण्याच्या नादात छायाचित्रकारांनी आपल्या घरामधील काही फोटो काढल्याचा आरोप आलिया भटने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. परवानगीशिवाय फोटो काढल्यामुळे आलिया छायाचित्रकारांवर चांगलीच वैतागली आहे. आपण लिव्हिंग रूममध्ये असताना समोरच्या इमारतीवरून चोरून फोटो काढण्यात आल्याचे तिचे म्हणणे आहे. आलियाने ही गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीरपणे संताप व्यक्त केला आहे. आपल्या पोस्टमध्ये तिने मुंबई पोलिसांच्या अकाऊंटला टॅग करून मदतीची मागणी केली आहे. आलियाला त्यासाठी तिची बहीण शालीन, अर्जुन कपूर आणि अनुष्का शर्मा यांनीही पाठिंबा दिला आहे. सर्वांनी सोशल मीडियावर आलियाच्या पोस्टला रिपोस्टकरून अशा छायाचित्रकारांविरोधात मते मांडली आहेत.