Fri, March 31, 2023

किन्हवलीकरांनी अनुभवला बैलगाडी शर्यतीचा थरार
किन्हवलीकरांनी अनुभवला बैलगाडी शर्यतीचा थरार
Published on : 22 February 2023, 1:08 am
किन्हवली, ता. २२ (बातमीदार) : शहापूर तालुक्यात किन्हवली येथे पहिल्यांदाच आयोजित केलेल्या बैलगाडी स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती. शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरातील चिखलगाव येथे गुरुनाथ देसले-पाटील व ग्रामस्थांनी आई भवानी मैदानावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. शर्यतीत सहभागी होण्यासाठी ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यातून अनेक हौशी स्पर्धक बैलगाडी घेऊन आले होते. तालुक्यात प्रथमच जिल्हाधिकारी कार्यालयातून अधिकृत परवानगी घेऊन अशा स्पर्धेचे आयोजन केल्याने हजारो प्रेक्षकांनी बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवला.
आमदार दौलत दरोडा यांनीही स्पर्धेत सहभागी होत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांच्या समवेत मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनसिंग पवार, उद्योजक बाळाशेठ पवार आदी उपस्थित होते.