
पडघ्यात माजी सैनिकांचा सत्कार
पडघा, ता. २३ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा येथील शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. शिवजयंतीचे औचित्य साधून हिंदू सांस्कृतिक मंच यांच्या वतीने सिद्धू तेलवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, नागरिकांना वस्तू, खाद्यपदार्थ व वीटभट्टीवरील मुले, कामगार यांना कपडेवाटप करून त्याच्यासोबत शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर रात्री धर्मजागरण कोकण प्रांतप्रमुख व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी राजेश कुंटे यांचे हिंदू समाजापुढील आव्हाने यावर व्याख्यान पार पडले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्यदलातील माजी सैनिक राजू पाटील, नीलेश पाटील, जगदीश पाटील, अनिल सुडंकर, अविनाश पाटील, दीपक कोरी, फुलसिंग सोलंकी, श्रीनिवास खामकर, अजित जाधव, कैलास चव्हाण, विजय गुप्ता उपस्थित होते. या वेळी या आजी-माजी सैनिकांना पुस्तके भेट देऊन मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.