अश्लिल व्हिडीओ पाठवून तरुणीला त्रास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अश्लिल व्हिडीओ पाठवून तरुणीला त्रास
अश्लिल व्हिडीओ पाठवून तरुणीला त्रास

अश्लिल व्हिडीओ पाठवून तरुणीला त्रास

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : एका २६ वर्षीय डॉक्टर तरुणीच्या मोबईलवर अश्लील व्हिडिओ व व्हाइस रेकॉर्डिंग पाठवून तिच्याकडे लैंगिकतेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
घटनेतील तक्रारदार तरुणी वाशीमध्ये राहण्यास आहे. डिसेंबर महिन्यामध्ये एका अज्ञाताने या तरुणीच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवला होता. त्यानंतर तरुणीला व्हाइस रेकॉर्डींग पाठवून तिच्याकडे लैंगिकतेची मागणी केली. त्यानंतर देखील या तरुणीला वेगवेगळ्या मोबाईल फोनवरून अश्लील व्हिडीओ पाठवण्यात येत होते. गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरुच असल्याने अखेर या तरुणीने वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी विनयभंग तसेच आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.