
कामण, वालिवमध्ये विकास कामाचे भूमिपूजन
विरार, ता. २५ (बातमीदार) : बोईसरचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते वालीव विभाग आणि कामण विभागात जवळपास १२ कोटी रक्कमेच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. वालिव विभाग आणि कामण या महापालिका क्षेत्रात खालील विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता, यामध्ये गोलानी नाका ते महावितरण कार्यालय रस्त्यावर आरसीसी गटार बांधणे, यास वालीव गावातील डी.पी रोड हॉटेल रेजन्सी ते साई पूजा जनरल स्टोअर, चिंचपाडा येथे आरसीसी गटार, कामण स्मशानभूमीलगत संरक्षण भिंत बांधणे आणि सुशोभीकरण करणे या कामाचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी आमदार राजेश पाटील यांच्या समवेत बहुजन विकास आघाडीचे नेते तथा ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अशोक कोलासो, विल्सन फरगोस, सुनील आचोळकर, प्रीती म्हात्रे, दिनेश म्हात्रे, अजित भोईर, महेश धनगर, पूनित पाटील, जयप्रकाश पाटील, नागेश शेळके, दिलीप गायकवाड, लता रणधीर कांबळे आदी उपस्थित होते.