
अत्याचारप्रकरणी दहा वर्षे कारावासाची शिक्षा
ठाणे, ता. २३ : घरी थंड पाणी आणण्यास सांगून तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नवी मुंबईतील ३० वर्षीय तरुणाला ठाणे विशेष न्यायाधीश (पोक्सो कायदा) आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी गुरुवारी (ता. २३) दोषी ठरवून दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
नवी मुंबईत १७ मे २०१८ रोजी दुपारच्या सुमारास मोहमद गुलजार मोहम्मद इस्माईल याने मुलीला त्याच्या घरी थंड पाणी आणण्यास सांगितले. याचदरम्यान त्याने तिच्या अत्याचार केला. याप्रकरणी २० मे २०१८ रोजी त्याच्याविरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला त्याच दिवशी अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांच्यासमोर खटला आल्यावर सरकारी वकील विजय मुंडे यांनी सादर पुरावे केले. तपासलेले ११ साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून न्यायाधीश सिरसीकर यांनी आरोपीला दोषी ठरवून दहा वर्षे कारावास आणि एक हजार रुपये अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास याला आणखी एक महिना सश्रम कारावास भोगावा लागेल असे आदेश दिले आहेत.