‘स्पर्श’ काव्यसंग्रहाचे उद्या प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्पर्श’ काव्यसंग्रहाचे उद्या प्रकाशन
‘स्पर्श’ काव्यसंग्रहाचे उद्या प्रकाशन

‘स्पर्श’ काव्यसंग्रहाचे उद्या प्रकाशन

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ ः दीपक शेडगे यांच्या ‘स्पर्श’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (ता. २५) रविंद्र नाट्यमंदिरातील पु. ल. देशपांडे अकादमी येथे सायंकाळी चार वाजता होणार आहे. अक्षर संवेदना प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनावेळी प्रमुख अतिथी आणि वक्ते म्हणून दिनकर गांगल, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, अरूण नलावडे, व्ही.एन.मयेकर, ज्ञानेश महाराव, चंद्रशेखर प्रभू, मीनाक्षी पाटील, संतोष रोकडे, ॲड. उदय वारूंजीकर, जयु भाटकर, रविराज गंधे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी राजीव चुरी, प्रा. विसुभाऊ बापट, उत्तरा मोने, प्रा.प्रतिभा सराफ, राजन बने, संजय भुस्कुटे, कमलाकर राऊत, स्वाती गावडे, डॉ.शैलेश श्रीवास्तव, उत्तरा मोने कवितांचे सादरीकरण करणार आहे.