एससीएलआर-एलबीएस मार्ग जोडण्यासाठी नवा पूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एससीएलआर-एलबीएस मार्ग जोडण्यासाठी नवा पूल
एससीएलआर-एलबीएस मार्ग जोडण्यासाठी नवा पूल

एससीएलआर-एलबीएस मार्ग जोडण्यासाठी नवा पूल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : मुंबईत सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पाच्या उद्घाटन काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या प्रकल्पाशी संबंधित अशी पुढील विस्तारीकरणाचे काम आता मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. त्यानुसार सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) व लालबहादूर शास्त्री मार्ग (एलबीएस) यांच्या कनेक्टिव्हिटीसाठी फ्लायओव्हरचे काम हाती घेण्यात आले आहे.

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड प्रकल्पाअंतर्गत एलबीएस रोडला कनेक्टिव्हिटीचा फ्लायओव्हरचा पर्याय सद्यस्थितीला नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होते. सध्याच्या कुर्ल्यातील सीएसएमटी रोड ते एससीएलआर या प्रकल्पाला हा फ्लायओव्हर उपयुक्त ठरणार आहे. या फ्लायओव्हरचा फायदा म्हणजे बीकेसी जंक्शन येथून तीन सिग्नल टाळण्यासाठीचा पर्याय असणार आहे. त्यामध्ये पहिला सिग्नल हा बीकेसी जंक्शन येथे आहे, तर दुसरा बीकेसी सीएसएमटी रोड जंक्शनला आहे. तिसरा एलबीएस रोड जंक्शन येथे आहे. त्यामुळे तीन सिग्नल टाळत थेट घाटकोपरच्या दिशेने जाण्यासाठी हा पर्याय उत्तम ठरणार आहे.

---
२९.३८ कोटी रुपयांचा खर्च
या पुलाची एकूण लांबी २४६ मीटर आहे; तर यासाठी एकूण २९.३८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या कामासाठी २४ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. कुर्ला एल वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या अनधिकृत गॅरेजची दुकाने जर हटवण्यात आली असती, तर या पुलाची गरजही लागली नसती. एससीएलआर प्रकल्पांतर्गत पूल उभारताना एमएमआरडीएने १ हजार कोटी रुपये या पट्ट्यासाठी खर्च केले आहेत.