Thur, March 23, 2023

डोंबिवलीमध्ये आज आरोग्य शिबिराचे आयोजन
डोंबिवलीमध्ये आज आरोग्य शिबिराचे आयोजन
Published on : 24 February 2023, 1:02 am
डोंबिवली : शहराच्या पूर्व भागातील रामनगरमधील राजाजी पथावरील संजीवनी रुग्णालयात उद्या (ता. २५) मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराची वेळ सकाळी नऊ वाजल्यापासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत आहे. रक्त शर्करा, अस्थिविरलता, संगणकयुक्त मज्जातंतू तपासणी, ग्लायकोस्युलेटेड हिमोग्लोबीन (फक्त निवडक २० जणांसाठी), हिमोग्लोबीन या तपासणीसंबंधित हे शिबिर असल्याचे सांगण्यात आले.